पावसाळा आणि कोल्हापुरी चप्पल? देखभालीसाठी करा या ४ सोप्या गोष्टी.

kolhapuri chappal maintenance in rain fungus leather fungal growth

अस्सल चामड्याची कोल्हापुरी वहाण जिवंत असल्यासारखी वागते. नेहमीचे वहाण वापरणारे लोक, त्यांच्या वेगवेगळ्या वहाणांना कश्या वेगवेगळ्या personality आहेत ते सांगत असतात. पण तरी जवळपास सगळ्या वहाणांमधे एक समान असणारी गोष्ट म्हणजे वहाण आणि पाऊस यांचं इतकं चांगलं जमत नाही.
(मातीत, माळरानात रमणारी वहाण आणि कॉंक्रिटचं जंगल असणारं शहरं यांचं थोडं असंच वाकडं होतं पण वहाणांना अँटी स्लिपरी सोल लावून या दोघांचं सूत आपण जमवून आणलंय. वहाण ऑर्डर करतांना तुम्ही फक्त हा सोल ऍड करायचा आणि आम्ही वहाणेला लावून पाठवू).

बाकी वर्षभर अस्सल रांगडा मराठी आवाज करायचा असेल तर पावसाळ्यात वहाणेची थोडीशी काळजी घेणे नक्कीच worth आहे.

तुमच्या वहाणेची काळजी कशी घ्यावी यासाठी ह्या ४ सोप्या टिप्स वापरा:

  1. पावसाळ्याच्या सुरुवातीला कापडाने कोल्हापुरी छान कोरडी पुसून घ्यावी.

  2. त्याला घरात उपलब्ध असलेलं तेल लावून घ्यावं (बऱ्याचदा काही लोक डिझेलही लावतात पण ते आवश्यकच आहे असं नाही).

  3. कोल्हापुरीला कोर्या कागदात गुंडाळून कापड्याच्या किंवा प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवून द्या.

  4. बऱ्याचदा पावसात कोल्हापुरी हवेतल्या आद्रतेमुळे बुरशी धरते तेव्हा वरचेवर कोल्हापुरी काढून, तिला स्वच्छ करून, तेल लावून ठेवावी अथवा ती कडक होऊ शकते.


वरील पद्धतीने कोल्हापुरी सांभाळल्यास पावसाळ्यात कोल्हापुरीला काहीही होणार नाही आणि हिवाळ्यात ती पुन्हा सुस्थितीत वापरायला मिळेल.

आणि पावसाळा संपल्या संपल्या आपले सणासुदीचे दिवस सुरु होतात, हिवाळ्यात सग्नसराईचे दिवसही आहेत. तेव्हा वहाणा घ्यायला झुंबड उडते.
Why not beat the crowd? आत्ताच १५% सूट सुरु आहे तर आरामात वहाण घेऊन ठेवा.
वहाण बुक करतांना "VHAANRAIN" हा कोड वापरा आणि निवडक वहाणांनवर १५% इन्स्टंट डिस्काउंट मिळवा!

BookChappalCraftHandicraftHandmadeKolhapuriKolhapuri chappalLeatherLeather careLeather craftMaintenanceMarathiMonsoonOfferRainShopShopping

Leave a comment

All comments are moderated before being published