महाराष्ट्राच्या पारंपारिक वहाणच्या  इतिहासात शाहू कोल्हापुरी ला नक्कीच खूप मानाचं आणि मोठं असं स्थान आहे .

कोल्हापुरातल्या स्थानिक कारागिरांचा छत्रपती श्री शाहू महाराजां बद्दल असलेल्या आदरामुळे  त्यांनी या व्हाणेला शाहू  नाव दिलं , कोल्हापूरी वहाणेच्या इतिहासातला आणि एकूण क्षेत्रातला शाहू वहाण  हा परमोच्च मानबिंदू मानला जातो उत्कृष्ट डिझाईन म्हणजेच नक्षीकाम आणि तितकीच बारकाईने त्यावर केली गेलेली कलाकुसर ही शाहू कोल्हापुरी ची खासियत पण त्यातूनही अतिशय भक्कम केलेली बांधणी शाहू कोल्हापुरी ला जेवढी सुंदर तेवढीच रांगडी बनवते तीन तळापासून सात तळापर्यंत येणारी ही कोल्हापुरी वहाण  वापरणाऱ्यांच्या बुद्धीचा कस लावते, एका शाहू वहाणमध्ये कित्येक प्रकारचे कलाकुसर करता येतील हे बघण म्हणजे सोहळा असतो ,  अस्सल कारागीर ही वहाण  नेहमी पारंपारिक पद्धतीने बनलेल्या मसडी चामड्यातच बनवतो  जे आपल्या शरीरासाठी पण खूप चांगलं असतं. शाहू कोल्हापुरी बनवणं हे कोणाही कारागिराला सहज शक्य नसतं त्यासाठी खूप मेहनत आणि अनुभवाची गरज असते . कित्येक वर्ष ह्या क्षेत्रात काम केल्यानंतर शाहू वहाण  बनवणं काही कारागिरांना जमतं आजही या क्षेत्रात फार कमी कारागीर आहेत जे  अस्सल शाहू वहाण बनवू  शकतात आणि त्यांची संख्या वाढवण आणि ही कला जपणे हेच मुख्य उद्दिष्ट आहे अशा कारागिरांना त्यांचा अपेक्षित दर्जा प्राप्त करून देणे ,  त्यांच महत्व  समाजाला समजावून सांगणे त्यांच्या कलेचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवणे हेच वहाणच उद्दिष्ट आहे .
हे कारागीर आज खूप मोठी कला आणि तिचा वारसा आपल्यात जिवंत ठेवून आहेत त्यामुळे त्यांना जपणे आणि त्यांना योग्य  सामाजिक दर्जा आणि आर्थिक दर्जा मिळवून देणे हे आम्ही महत्वाचे समजतो.

Kolhapuri chappalShahu kolhapuri chappal

Leave a comment

All comments are moderated before being published