"वहाणच का?"
ह्या प्रश्नाच्या उत्तराआधी "वहाण" हे नावच का? हे विचारण जास्त गरजेच आहे.
"वहाण" हा शब्द बऱ्याच जणांना नक्की ठाऊक नाही ...
"वहाण" हा एक मराठी शब्द असून, तो बोलीभाषेत आजही व्हान किंवा वाण/व्हाण असा अपभ्रंश होऊन वापरला जातो. तर माणसाला वाहून नेते म्हणूनही तेव्हा वहाण हे नाव पडल असावं, पण कालानुरूप आज त्याला वेगळा अर्थ प्राप्त झालाय. आज तो केवळ पायातल्या चपलेचा म्हणून वापरला जाणारा शब्द उरता एका स्पेसिफिक काळातल्या चपलांना उद्देशून वापरायचा शब्द बनलेला आहे ...
वहाण म्हटलं कि डोळ्यासमोर तो काळ उभा राहतो जेव्हा चप्पल ही प्रत्येकासाठी स्वतंत्र बनवल्या जायची. त्यासाठी प्रत्येक गावगाड्यात एक चांभार असायचा की जो ह्या कामात पारंगत असायचा.
या चपला खास प्रत्येकाच्या विनंतीवरून ज्याच्या त्याच्या पायाच्या मापानुसार बनवल्या जायच्या. तेव्हा आजच्या सारखी हजारो चपला "प्रोड्युस" करणारी मशिन्स नव्हती. वहाणा अश्या कधीच यंत्राने बनत नाहीत. वहाण बनवणं आणि वापरणं दोन्ही सोहळा असायचा. आधी कारागिराला वेळ मागितली जायची, त्याला पायाचं माप दिल जायचं, त्याला हवी असलेली डिजाईन समजावली जायची, मग तो वेळ सांगणार, मग कारागीर चांगलं चामडं घेणार, ज्याची छीलाई होणार, मग त्याचं कलाकुसरीचं काम सुरु होणार! ह्या सर्व बारकाईसोबतच ती जोड भक्कमपण असायला हवी म्हणून मजबूत शिवणसुद्धा दिली जायची, ते हि हाताने.
बारकाईची कामे, जसं 'पंच मारणे', 'वेणी विणणे', 'पट्ट्यांना नक्षीकाम' इत्यादी ह्या कारागीरांच्या घरातल्या स्त्रिया फावल्या वेळात करत असत. त्या स्वतःहि कारागीर असत आणि कलेला, घराला हातभार लावत असत. ह्या काळातल्या चपलांना वहाण म्हणायचे. जसं हि चप्पल बनवणं हा एक कलेचा सोहळा होता आणि हि चप्पल हि कलेचा नमुना होती, तशीच हि चप्पल वापरणं हा हि एक सोहळा असायचा. चांभाराकडून खास मापाची बनलेली चप्पल एकदा मिळाली कि तिला छान तेल वगैरे लावून आधी भिजत घालायचं, मग कडकडीत उन्हात छान वाळली कि मगच ती वहाण वापरायला काढायची.. अह्हा!
आजही कोणा वापरणार्याला त्या अनुभवाबद्दल विचारल तर तो नक्की सांगतो कि वहाण म्हणजे नक्की काय असतं ते..
हा काळाचा ठेवा सर्वांना पुन्हा एकदा अनुभवू द्यायचा, तो काळ पुन्हा जिवंत करायचा, त्या खास माप घेवून असलेल्या चपला अन त्याचा सोहळा लोकांना अनुभवू द्यायचा.. म्हणून वहाण हे नाव .
जाणून घेऊ: वहाणच का? ह्या प्रश्नासाठी आधी वहाण हे नावच का?
Tags: Chappal, Craft, Culture, Entrepreneurship, Handicraft, Handmade, Kolhapuri, Kolhapuri chappal, Leather, Leather craft, Vhaan